विश्वचषक विजेत्याला शाबासकीची थाप

विश्वचषक विजेत्याला शाबासकीची थाप
Published on

विश्वचषक विजेत्याला शाबासकीची थाप
वसई-विरार पालिकेकडून आयुष म्हात्रे यांचा सन्मान

विरार, ता. १४ (बातमीदार) ः एकोणीस वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे आयुष म्हात्रेने कर्णधारपद भूषवले होते. याच अनुषंगाने वसई-विरार पालिकेच्या सभागृहात त्यांचे अभिनंदन करून महापौरांनी पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
वसई-विरार शहर पालिकेचे महापौर अजीव पाटील यांनी संघभावना कशी असावी, हे आयुष म्हात्रेने नेतृत्वातून दाखवून दिल्याचे सांगितले. त्यांच्या या यशामुळे वसई तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल आहे. भविष्यात प्रशिक्षण, सराव तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वसई-विरार महापालिका, स्थानिक क्रीडा संस्था तसेच वसई तालुका आयुषच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असे बोलताना सांगितले. या वेळी क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शन, सहकार्याबद्दल पंकज ठाकूर यांचे कौतुक करण्यात आले. तसेच आयुष म्हात्रे यांनी भविष्यातही भारतीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. देशातील महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरप्रमाणे आयुषही भारतीय क्रिकेटमध्ये मोठे स्थान मिळवेल. क्रिकेटपटूंपैकी सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले असून आयुष म्हात्रे यांनाही भविष्यात असा सन्मान मिळेल, असा विश्वास बहुजन विकास आघाडीचे युवा नेते क्षितिज ठाकूर यांनी व्यक्त केला.
-----------------------------
नवोदितांना मार्गदर्शन करणार
वसई तालुक्यातील क्रिकेटपटूंसाठी योग्य मार्गदर्शन करणार आहे. मैदानावर क्रिकेट कसे खेळावे, याचे प्रशिक्षण क्रिकेटपटूंना देणार आहे. ज्या ठिकाणी माझी गरज लागेल त्या ठिकाणी आवर्जून मला बोलवा, तिथे मी नक्की येईन, असे आयुष म्हात्रेने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com