ठाणे पालिकेचा २३ मार्चला अर्थसंकल्प
ठाणे महापालिकेचा २३ मार्चला अर्थसंकल्प
स्थायी समितीच्या तिढ्यामुळे यंदा विलंब
ठाणे, ता. १४ : महापालिकेतील गेल्या तीन वर्षांपासूनची प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असली, तरी राजकीय पेचप्रसंगामुळे रखडलेला पालिकेचा अर्थसंकल्प अखेर येत्या २३ मार्चला सादर होणार आहे. स्थायी समिती अद्याप स्थापन होऊ न शकल्याने, हा अर्थसंकल्प थेट विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे पालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर महापौर, उपमहापौर आणि इतर पदांची निवड झाली; मात्र सत्तेचे मुख्य केंद्र मानली जाणारी ‘स्थायी समिती’ अद्याप अस्तित्वात आलेली नाही. फेब्रुवारीच्या सभेत सदस्य निवडीचा विषय मागे घेण्यात आला होता, तर त्यानंतरची ५ मार्चची सभा रद्द झाली. १८ मार्चच्या सभेच्या विषयपत्रिकेवरही हा विषय नसल्याने अखेर मार्चचा पंधरावडा उलटल्यानंतर अर्थसंकल्पाचा मुहूर्त ठरला आहे.
सोमवारी (ता. २३) सकाळी ११.३० वाजता महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत पालिका आयुक्त २०२५-२६चा सुधारित अर्थसंकल्प आणि २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा मूळ अर्थसंकल्प मांडतील. यासोबतच ठाणे परिवहन सेवेचा अर्थसंकल्पही मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.
आर्थिक स्थितीचे आव्हान
ठाणे पालिकेची आर्थिक स्थिती आजही फारशी समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. पालिकेवरील दायित्वाचा बोजा पुन्हा वाढू लागल्याने, या अर्थसंकल्पातून नवीन योजनांना किती वाव मिळतो आणि जुन्या कर्जाचे ओझे कसे कमी केले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने ठाणेकरांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

