मेट्रो मार्गावर उभारणार दूरसंचारचे जाळे
मेट्रो मार्गावर उभारणार दूरसंचारचे जाळे
मुंबई, ता. १४ : ‘एमएमआरडीए’कडून उभारल्या जात असलेल्या मेट्रो-७ अ अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेट्रो-९ या मार्गावर ‘एफकाॅन इंडिया’कडून दूरसंचार यंत्रणेचे जाळे उभारले जाणार आहे. त्याबाबतचे स्वीकृतिपत्र त्यांना मिळाले आहे. त्यामुळे संबंधित दोन्ही मेट्रो प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने जाणार आहेत. मुंबईसह एमएमआर क्षेत्रात ‘एमएमआरडीए’कडून मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. त्यानुसार मेट्रो ७ आणि ९चे काम अंतिम टप्प्यात असून या मार्गिकेवर दूरसंचार यंत्रणेचे जाळे उभारण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार ‘एफकाॅन इंडिया’ने १०३ कोटी रुपयांची निविदा भरली होती. सर्वात कमी त्यांची निविदा आल्याने हे काम त्यांना मिळाले असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, दूरसंचार यंत्रणा उपलब्ध करणे, त्याचे संचालन करून देण्याचे काम कंपनीकडून केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

