पुरेशा गॅस सिलेंडर अभावी पोयनाड बाजारपेठेतील हॉटेल व्यावसायिक संकटात

पुरेशा गॅस सिलेंडर अभावी पोयनाड बाजारपेठेतील हॉटेल व्यावसायिक संकटात

Published on

पुरेशा गॅस सिलेंडर अभावी पोयनाड बाजारपेठेतील हॉटेल व्यावसायिक संकटात

पोयनाड, दि. १४ (बातमीदार) : सध्या सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्या युद्धामुळे इतर देशांमधील परिस्थितीवर परिणाम होत आहे. या युद्धाचा पेट्रोलियम उत्पादनांवर परिणाम झाला आहे. या पेट्रोलियम उत्पादनांची झळ आता रायगड जिल्ह्यातील पोयनाड बाजारपेठेतील हॉटेल व्यवसायाला बसत असून पोयनाड बाजारपेठेतील अपुऱ्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याअभावी हाॅटेल व्यावसायिक संकटात सापडले आहेत.
पोयनाड ही आजूबाजूच्या ३० ते ३५ गावांची प्रमुख बाजारपेठ असून सध्या सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यवसायाला त्याचा मोठा फटका बसला आहे. व्यावसायिक सिलेंडरचे दर आणि त्याचा उपलब्ध असलेला साठा यांचा विचार करता पुढील दोन दिवस पुरेल इतकाच गॅस सिलेंडर उपलब्ध आहे. या टंचाईमुळे ऐन सणासुदीच्या काळात व्यवसायावर संक्रांत आली असून हॉटेल बंद करण्याची वेळ पोयनाड बाजारपेठेतील व्यवसायिकांवर आली आहे. तर गॅस सिलेंडरच्या अपुऱ्या पुरवठ्याअभावी आता पर्यायी व्यवस्था म्हणजेच चुलीवर पदार्थ बनवायचे कसे, आणि त्यातही गॅस सिलेंडर अभावी मिठाईचे पदार्थ तयार होऊ शकत नसल्याचे पोयनाड बाजारपेठेतील मिठाई विक्रेत्यांनी सांगितले. पोयनाड बाजारपेठेतील हॉटेल व्यावसायिकांकडे दोन दिवस पुरेल इतकाच गॅस सिलेंडरचा साठा आहे.
पोयनाड बाजारपेठेतेच नाही तर पेण-अलिबाग राज्यमार्गालगत असलेले हाॅटेल, चायनीज सेंटर, बिर्याणी हाऊस, वडापाव विक्रेते यांना देखील या व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा उपलब्ध नसल्याने मोठे संकट उभे ठाकले आहे.

ऐन सणासुदीच्या काळात संकट
चैत्र महिन्याचा प्रारंभ काही दिवसांनी होणार आहे. आणि या चैत्र महिन्यात गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती हे सण येत आहेत. या सणासुदीच्या काळात मिठाई आणि फरसाण यांना मोठी मागणी असते. पण आता व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्याने ऐन सणासुदीत पदार्थ बनवायचे कसे असे संकट पोयनाड बाजारपेठेतील व्यवसायिकांवर आले आहे.

गॅस सिलेंडर पुरेसे उपलब्ध नसल्याने मोठे हाल
पोयनाड परिसरात गॅस वितरण केंद्रांवर गॅस सिलेंडरची गाडी येत नसल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहे. ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केलेल्या व मोबाईलवर ओटीपी आलेल्याच ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळत आहे. तर ७ मार्चपासून पोयनाड परिसरात व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा उपलब्ध नाही.


छायाचित्र :

पोयनाड : गॅस वितरण केंद्रांवर पुरेशा गॅस सिलेंडर अभावी शुकशुकाट दिसून येत आहे. तर रिकामे सिलेंडर एकत्र करून ठेवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com