

पालिका रुग्णालयापर्यंत मोफत बेस्ट बस सेवा सुरू करा
शीतल गंभीर यांची पालिकेकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः पालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांना ये-जा करण्यासाठी खर्च परवडत नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेचे रुग्णालय ते जवळील रेल्वे स्थानकादरम्यान बेस्ट बसची मोफत सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी ठरावाची सूचना भाजप नगरसेविका शीतल गंभीर यांनी मांडली आहे. १७ मार्चला सभागृहाची बैठक आयोजित केली असून महापौर रितू तावडे काय निर्णय घेणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिकेची चार प्रमुख रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये, एक दंत रुग्णालय, १६ परिमंडळीय रुग्णालये, सहा विशेष रुग्णालये आणि २९ प्रसूतिगृहे आहेत. पालिका रुग्णालयात अत्याधुनिक व आपत्कालीन सोयीसुविधा, तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. तेथे अहोरात्र नाममात्र दराने उपचार मिळतात. म्हणूनच, मुंबईतीलच नव्हे तर, देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांत उपचारार्थ येतात. महापालिकेच्या रुग्णालयांत उपचारार्थ येणारे रुग्ण हे बहुतांशी गरीब असतात आणि अनेकदा रेल्वे स्थानकावर उतरल्यावर, रेल्वे स्थानकापासून रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी खर्च त्यांना परवडत नाही. रुग्णांची आर्थिक स्थिती लक्षात घेता या रुग्णांसाठी ‘नजीकचे रेल्वे स्थानक ते महापालिकेचे रुग्णालय’ अशी ‘बेस्ट’ उपक्रमाची मोफत बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी ठरावाची सूचना शीतल गंभीर यांनी सभागृहात मांडली आहे.
---------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.