एआय व सायबर हल्ल्यांमुळे इंटरनेटची सुरक्षा धोक्यात

एआय व सायबर हल्ल्यांमुळे इंटरनेटची सुरक्षा धोक्यात

Published on

एआय, सायबर हल्ल्यांमुळे इंटरनेटची सुरक्षा धोक्यात

प्रभादेवी, ता. १४ : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर हल्ल्यांमुळे इंटरनेटच्या मूळ आधाराला नवा धोका निर्माण झाला आहे. यामुळे सायबर सुरक्षेची नवी समीकरणे समोर येत असून, जागतिक सहकार्याशिवाय सुरक्षित इंटरनेट अशक्य आहे, असे मत सायबर सुरक्षातज्ज्ञ मेजर विनीत कुमार यांनी मांडले आहे.
वांद्रे येथे ‘इम्पॅक्ट एआय २०२६’मध्ये ‘डिजिटल संघर्षशीलता आणि जबाबदार एआय फ्रेमवर्क्स’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित चर्चासात्रात ‘सायबरपीस’ या जागतिक स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक व जागतिक अध्यक्ष मेजर विनीत कुमार यांनी सायबर सुरक्षेचे महत्त्व विशद केले.
डीएनएस प्रतिकारक्षमता, अतिमहत्त्वाच्या इंटरनेट पायाभूत सुविधांचे संरक्षण आणि सायबर प्रतिकारक्षमतेसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या चौकटी याविषयी विनीत कुमार यांनी सखोल माहिती सादर केली.
सायबर हल्ले हे वाढत्या प्रमाणात डिजिटल पायाभूत संरचनेला लक्ष्य बनवत आहेत. त्यामुळे या चर्चेत तंत्रज्ञानापलीकडे जाऊन जागतिक सहकार्य, धोरणात्मक समन्वय आणि प्रादेशिक तयारी यांसारखे प्रश्न पुढे येत आहेत. वाढते सायबर हल्ले, भू-राजकीय तणाव आणि कार्यात्मक कमकुवतपणामुळे इंटरनेटचा कणा असलेल्या डीएनएसला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अधिक बळकट जागतिक समन्वयाची व संकेतांची गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
मेजर विनीत कुमार यांना ‘सर्वोत्तम सामाजिक उद्याजक-२०२५’ या पुरस्काराने गौरविण्यात आले असून, त्यांच्या नेतृत्वाखालील उपक्रमांनी जगभरातील २० कोटींपेक्षा अधिक नागरिकांपर्यंत पोहोचून जबाबदार डिजिटल वर्तन आणि सायबर लवचिकतेबाबत जागरूकता निर्माण केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com