डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक सभेच्या साक्षीदार रखमाबाई पंडीत यांचे निधन
रखमाबाई पंडित यांचे निधन
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक सभेच्या साक्षीदार
शहापूर, ता. १४ (वार्ताहर) : शहापूर तालुक्यातील कसारा गावात चवदार तळ्याच्या सत्याग्रहापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक सभा घेतली होती. या सभेच्या साक्षीदार रखमाबाई पांडुरंग पंडित (वय १०४) यांचे शनिवारी (ता. १४) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.
शनिवार १८ फेब्रुवारी १९३३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठाणे जिल्ह्याची परिषद कसारा गावात घेतली होती. त्यांच्या या सभेतील तडाखेबाज भाषणाचे पडसाद महाराष्ट्र आणि देशपातळीवरच नाही तर थेट ब्रिटिश कौन्सिलमध्ये उमटले होते. त्या वेळी रखमाबाई या नऊ वर्षांच्या होत्या. कसाऱ्यातील मिलिंदनगर भागात राहणारे कोंडाजी नामदेव पंडित यांच्या घरासमोरच्या अंगणात ही परिषद झाली होती. तसेच पंडित यांच्याच घरी बाबासाहेबांनी रात्रीचे जेवण घेतले होते. ही परिषद पाहिलेल्या आणि बाबासाहेबांचे भाषण ऐकलेल्यांंपैकी रखमाबाई पंडित या होत्या. बाबासाहेबांच्या आठवणीने त्यांना गहिवरून यायचे. बाबासाहेब कसाऱ्यात आले तेव्हा त्यांच्यासोबत बंदोबस्तास पाच पोलिस होते. तसेच बाबासाहेब कसे दिसत व कसे खणखणीत बोलत, या आठवणी आतापर्यंत रखमाबाईंकडून ऐकायला मिळत होत्या.
शनिवारी दुपारी रखमाबाईंवर कसारा गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात सून, नातवंडे, मुली असा परिवार असून त्यांच्या अंत्ययात्रेत आंबेडकरी चळवळीतील, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. या वेळी रखमाबाईंच्या निधनाबद्दल उपस्थितांनी दु:ख व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

