स्वच्छतागृहाची पायरी कोसळली

स्वच्छतागृहाची पायरी कोसळली

Published on

स्वच्छतागृहाची पायरी कोसळली
भांडुपमध्ये चाळीतील घराचे मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली
मुलुंड, ता. १४ (बातमीदार) : भांडुप पश्चिम येथील साई हिल परिसरात दीपक शिंदे चाळीजवळील सार्वजनिक स्वच्छतागृहाची पायरी गुरुवारी (ता. १२) रात्री अचानक कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली. पायरीचा तुटलेला भाग येथील रहिवासी विलास सावंत यांच्या लक्ष्मी सदन चाळीत असलेल्या घरावर पडल्याने त्यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पायरी कोसळल्यानंतर परिसरातील जमीनही खचल्याने जवळील घरे आणि सार्वजनिक सुविधांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या स्वच्छतागृहाची पायरी गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत धोकादायक अवस्थेत होती. गटाराचे पाणी सतत झिरपत असल्याने पायऱ्यांची मजबुती कमी झाली होती. यासंदर्भात रहिवाशांनी संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या; मात्र त्याची कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नव्हती. अखेर गुरुवारी रात्री पायरी अचानक कोसळल्याने परिसरातील माती मोठ्या प्रमाणात खचली.
या घटनेमुळे सार्वजनिक स्वच्छतागृह तसेच काही घरांच्या पायाभूत रचनेवरही परिणाम झाला असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी पालिका, म्हाडा तसेच तहसीलदार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्याच्या सूचना दिल्या. या वेळी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा भविष्यातील दुर्घटनेसाठी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून साई हिल परिसरातील या समस्येबाबत रहिवाशांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. माझ्याकडेही यासंदर्भात तक्रारी आल्या होत्या आणि मी संबंधित प्रशासनाला कळवले होते. मात्र योग्य दखल न घेतल्याने अखेर ४० ते ५० कुटुंबे राहणाऱ्या या परिसरातील स्वच्छतागृहाची पायरी कोसळली. संभाव्य धोका टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात.
- विवेक सावंत,
सामाजिक कार्यकर्ते व अध्यक्ष, साई हिल सार्वजनिक उत्सव समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com