विद्यार्थ्यांच्या विकासाला प्राधान्य

विद्यार्थ्यांच्या विकासाला प्राधान्य

Published on

विद्यार्थ्यांच्या विकासाला प्राधान्य
मुंबई विद्यापीठाचा १०५४.१२ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

मुंबई, ता. १४ : गुणवत्ता, सर्वसमावेशकता आणि उत्कृष्टतेला प्राधान्य देत मुंबई विद्यापीठाचा २०२६-२७ या वित्तीय वर्षांचा १,०५४.१२ कोटींचा अर्थसंकल्प शनिवारी (ता. १४) झालेल्या अधिसभेत मंजूर करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या अधिसभेत यावर्षीचा हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. यामध्ये १७२  कोटी ६३ लाखांची तूट दाखविण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या अर्थसंकल्पामध्ये संशोधन आणि नावीन्यपूर्ण संस्कृतीच्या बळकटीकरण, उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण आणि वैश्विक नागरिकत्व शिक्षणासाठी पुढाकार, विद्यार्थी साहाय्य आणि प्रगती उपक्रम, माजी विद्यार्थी कनेक्ट आणि विद्यापीठ-औद्योगिक साहचर्य उपक्रम यासह शैक्षणिक आणि गव्हर्नन्स उत्कृष्टता उपक्रमांसाठी ७५ कोटींची भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये विविध नावीन्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये केंद्र व राज्य सरकार आणि सीएसआरअंतर्गत १८७ कोटी रुपयाचा  निधी प्राप्त होणार असून यामध्ये केंद्र शासनाकडून १२९.५६ कोटी, राज्य शासनाकडून ३३ कोटी, सीएसआरअंतर्गत १३.९१ कोटी आणि मुंबई विद्यापीठाकडून रुपये १० कोटी अर्थसंकल्पीय तरतुदीचा समावेश आहे. यामध्ये विद्यार्थी कल्याण आणि सर्वसमावेशक विकासासाठी रुपये पाच कोटींची तरतूद करण्यात आली असून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये एक खिडकी प्रणाली आणि विद्यार्थी मदत कक्षाची स्थापना, विद्यार्थ्यांसाठी शिकण्यासाठी साहाय्य प्रणाली व आयसीटी सुविधांचा विस्तार, समान संधी कक्षाची बळकटीकरण तसेच सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य देण्याचा समावेश आहे.
--
माजी विद्यार्थी संपर्क व गतिमान
विद्यापीठ विभाग तसेच संलग्न महाविद्यालयांच्या माजी विद्यार्थी संघटनांशी संपर्क साधून युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई अलुमनी असोसिएशन अधिक बळकट करण्यात येईल. तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना ‘युनिव्हर्सिटी डायमंड’ हा विशिष्ट माजी विद्यार्थी पुरस्कार प्रदान केला जाईल आणि दानशूरता तसेच सीएसआर  निधी उभारणीसाठी जागतिक माजी विद्यार्थी नेटवर्क विकसित केले जाणार आहे.
--
गुणवत्ता, समावेशकात आणि उत्कृष्टता उपक्रम
गुणवत्ता, समावेशकात आणि उत्कृष्टता या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी प्रशासन विभागामार्फत रुपये ३५ कोटींच्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी प्रस्तावित आहे. अमृतकालाच्या पार्श्वभूमीवर संस्थात्मक विकास आराखडा तयार करून अभिनव कार्यक्रम राबविणे, तसेच विकसित भारत@२०४७ या ध्येयाशी सुसंगत विद्यापीठीय उपक्रम राबविणे, यावर भर दिला जाणार आहे. यासोबतच मुंबई विद्यापीठाला जागतिक दर्जाचे विद्यापीठ बनविण्यासाठी व्यापक मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com