जमाती प्रमाणपत्र पडताळणीसाठी २.५० लाखांची लाच घेताना उपसंचालक एसीबीच्या जाळ्यात

जमाती प्रमाणपत्र पडताळणीसाठी २.५० लाखांची लाच घेताना उपसंचालक एसीबीच्या जाळ्यात

Published on

लाच घेताना उपसंचालक एसीबीच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : जमाती प्रमाणपत्र पडताळणीची फाइल जिल्हा स्तरावरून पुढे मार्गी लावण्यासाठी कोकण विभागाच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती उपसंचालक (संशोधन) मीनाक्षी उन्हाळे यांना दोन लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांच्या पत्नी व मुलीच्या जमाती प्रमाणपत्र पडताळणीची फाइल जिल्हा स्तरावरून पुढे मार्गी लावण्यासाठी कोकण विभागाच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती उपसंचालक मीनाक्षी उन्हाळे यांनी २.५० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदारांनी संबंधित तक्रार १२ फेब्रुवारी २०२६मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड-अलिबाग कार्यालयाकडे केली. १३ फेब्रुवारी २०२६ मध्ये पडताळणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे २.५० लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्यास सहमती दर्शवल्याचे निष्पन्न झाले. यानंतर १३ मार्च २०२६ मध्ये ठाण्यातील संबंधित कार्यालयात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून दोन लाख ५० हजार रुपयांची रक्कम घेताना मीनाक्षी उन्हाळे यांना त्यांच्या केबिनमध्ये रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com