परप्रांतीय कामगारांचे पोटापाण्याचे वांदे

परप्रांतीय कामगारांचे पोटापाण्याचे वांदे

Published on

परप्रांतीय कामगारांचे पोटापाण्याचे वांधे
सिलिंडर मिळत नसल्याने जेवण करण्यात अडचणी

वाडा, ता. १५ (बातमीदार) ः तालुक्यात सध्या घरगुती सिलिंडरची टंचाई जाणवत आहे. त्याचा सर्वाधिक फटका परप्रांतीय कामगारांना बसला असून जेवण बनवण्यासाठी गॅस मिळत नसल्याने पोटापाण्याचे वांधे झाले आहेत.
वाडा तालुक्यात एक हजाराच्या आसपास कारखाने आहेत. या कारखान्यात हजारो परप्रांतीय कामगार काम करतात. इराण- अमेरिका- इस्राईलमधील युद्धामुळे वाडा तालुक्यात घरगुती सिलिंडरची टंचाई जाणवत आहे. स्थानिक रहिवाशांकडे एचपी कंपनीचे गॅस सिलिंडर आहेत. तर परप्रांतीयांकडे भारत गॅस, रिलायन्स गॅस कंपन्यांचे सिलिंडर आहेत; मात्र गॅसचा बाटला मिळत नसल्याने जेवण बनवायचे कसे, असा यक्षप्रश्न सतावत आहे.
------------------
दोन दिवसांपूर्वीच सिलिंडर संपला आहे. दोन दिवसांपासून बाहेरून जेवण आणत आहे; पण अशीच परिस्थिती राहिली तर पुन्हा गावाकडे जावे लागेल.
- अमरनाथ चव्हाण, बांधकाम ठेकेदार
-------------------------------
माझ्याकडे रिलायन्सची एजन्सी आहे. गॅस भरण्यासाठी गाड्या उभ्या आहेत; मात्र गॅस भरून मिळत नसल्यामुळे शेकडो ग्राहक ताटकळत आहेत.
- सुनील सोनावणे, आदित्य गॅस मार्केटिंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com