मिठागरांवरील प्रकल्पांना आठकाठी

मिठागरांवरील प्रकल्पांना आठकाठी

Published on

मिठागरांवरील प्रकल्पांना आठकाठी
उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांचे वाणिज्यमंत्र्यांना साकडे
भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : मिरा-भाईंदर पालिकेचे विविध विकास प्रकल्प मिठागरांच्या जमिनीवर आहेत, पण जमिनी पालिकेकडे हस्तांतर झाल्या नसल्याने सर्व प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे या प्रकरणात वाणिज्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची विनंती उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी केली आहे.
महापालिकेचे अनेक लोकोपयोगी प्रकल्प मीठ विभागाच्या जामिनीवर प्रस्तावित आहेत. यात प्रामुख्याने मुर्धा गावाच्या मागच्या बाजूने जाणारा विकास आरखड्यातील ४५ मीटर रस्ता, मिरा रोड पूर्व व पश्चिम यांना जोडणारा उड्डाणपूल, नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ते भाईंदर एसटी डेपोपर्यंतचा रस्ता, मिरा रोड येथील रेल्वे समांतर रस्ता, भाईंदर पश्चिम येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, राई, मुर्धा, मोरवा गावांतील सार्वजनिक स्वछतागृहे, ऐतिहासिक जंजिरे धारावी किल्ल्याचे सुशोभीकरणाचा समावेश होतो. या जमिनी पालिकेकडे हस्तांतर होणे आवश्यक असल्याने केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी ध्रुवकिशोर पाटील यांची भेट घेताना लोकहिताशी संबंधित जमिनी पालिकेकडे हस्तांतर करण्याची मागणी केली.
---------------------------------
मोबदला देण्याची तयारी
मिठागरांच्या जमिनी हस्तांतरणासंदर्भात २०२४ मध्ये नवे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेने, राज्य सरकारने आवश्यक त्या सर्व परवानग्या. प्रतिज्ञापत्रे सोपस्कार पूर्ण करून ऑक्टोबरमध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्रालयांकडे सादर केला आहे. मीठ विभागाच्या नव्या धोरणानुसार जमिनींचा मोबदला देण्याची तयारी पालिकेने दर्शवली आहे. मात्र, या प्रस्तावावर कोणताही निर्णय झाला नसल्याने सर्व प्रकल्प रखडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com