साथीच्या रोगांचे गंजाडमध्ये सावट

साथीच्या रोगांचे गंजाडमध्ये सावट

Published on

साथीच्या रोगांचे गंजाडमध्ये सावट
विहिरीलगत सांडपाणी साचल्याने धोका
कासा, ता. १५ (बातमीदार)ः डहाणू तालुक्यातील गंजाड गावात ‘जलजीवन मिशन योजने’अंतर्गत गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर बांधण्यात आली आहे. या विहिरीच्या कडेला सांडपाणी, कचरा, चिखल साचत असल्याने आरोग्यावर गंभीर परिणामाची शक्यता आहे.
गंजाड ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील दुकाने, घरांमधील सांडपाणी थेट विहिरीजवळ सोडले जात आहे. विहिरीच्या कडेला कचरा, चिखल, दुर्गंधीयुक्त पाणी साचल्याने पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता धोक्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना अस्वच्छ पाणीपुरवठा होण्याचा धोका निर्माण झाला असून, विविध साथीचे रोग पसरण्याची भीती आहे. याशिवाय गटारातील दूषित पाणीही विहिरीत शिरत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा बाधित होण्याची भीती असल्याने परिस्थिती चिंताजनक होण्याची चिंता आहे.
------------------------------
खोदकामामुळे धुळीचे लोट
गंजाड परिसरात खडी तयार करण्याचा प्रकल्प असल्याने परिसरात प्रदूषण वाढले आहे. विहिरीसमोरून जाणाऱ्या राज्यमार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडत आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे गंजाडसारख्या मोठ्या गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
-------------------------------
गंजाड गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ मोठ्या प्रमाणात सांडपाणी येत आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील धुळीमुळे पाण्यात प्रदूषण वाढत असून, रोगराई पसरण्याचा धोका आहे.
- धनसुख प्रजापत, ग्रामस्थ
------------------------------
विहिरीजवळील सांडपाणी रोखण्यासाठी दुकानदार, गाळेधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. आता पुन्हा ग्रामपंचायतीत बोलावून कारवाई केली जाईल.
- अभिजित देसक, सरपंच, गंजाड ग्रामपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com