

अशेरीगडावर शिवभक्तांची मांदियाळी
तोफगाडे लोकपर्णाचा सोहळा; शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानचा उपक्रम
कासा, ता. १५ (बातमीदार)ः डहाणू तालुक्यातील अशेरीगडावरील प्राचीन तोफांचे जतन, संवर्धनासाठी शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानच्या पुढाकारातून तोफांना नव्याने तोफगाडे बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा शिवभक्तांच्या उपस्थितीत रविवारी उत्साहात पार पडला.
अशेरीगडावर तीन तोफा विद्यमान होत्या. अलीकडे शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानच्या गडरक्षकांना गड परिसरात आणखी दोन तोफा आढळून आल्या. त्या तोफाही गडावर चढवून पाचही तोफांना नव्याने तोफगाडे बसवण्यात आले आहेत. यानिमित्ताने शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानान रविवारी तोफांच्या लोकार्पणाचा सोहळा गडावर पार पडला. या वेळी गड परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
-----------------------------
भंडाऱ्याची उधळण
गडदेवतेची पूजा, तोफगाड्यांचे पूजन तसेच भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. या वेळी शिवरायांचा आठवावा प्रताप ही प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर उपस्थित शिवभक्तांना गडाचा इतिहास व संवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यासाठी श्रमदान, साहित्यरूपी, आर्थिक स्वरूपात अनेकांनी सहकार्य केले आहे. त्यांचे निवृत्त पुरातत्त्व विभाग अधिकारी व गड अभ्यासक सचिन जोशी यांनी कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.