पाणीटंचाईच्या त्रासातून मुक्ती
पाणीटंचाईच्या त्रासातून मुक्ती
पालघर जिल्ह्यातील धामणी धरणात ६१.८६ टक्के साठा
कासा, ता. १५ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील धामणी धरणात ६१.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे; पण कवडास धरणातील पाणीसाठ्यात काहीअंशी घट झाली आहे. तरी नागरिकांनी चिंता करण्याचे कारण नसल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.
वाढत्या उन्हाने धरणांमधील पाण्याच्या पातळीत नैसर्गिकरीत्या घट होत आहे; मात्र उपलब्ध साठा पुरेसा असल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी पाणीपुरवठा सुरळीत राहणार असल्याचे सूर्या प्रकल्पातील अभियंता प्रवीण भुसारे यांनी सांगितले. धामणी धरणाची साठा क्षमता ११८.६० मीटर इतकी असून सध्या धरणातील पाण्याची पातळी ११०.९० मीटरपर्यंत आहे. धरणात सध्या सुमारे १७०.९५९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून तो सुमारे ६१ टक्के भरलेला आहे. तर धामणी धरणाखालील कवडास तुलनेने लहान धरण असून साठा क्षमता ७३.१० मीटर आहे. सूर्या प्रकल्पातील या धरणातून डाव्या व उजव्या कालवाद्वारे शेकडो गावांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो.
--------------------------------------
१५ मेपर्यंत सिंचनासाठी पाणी
- कवडास धरणातून डाव्या कालव्यातून सुमारे २०० क्युसेस तर उजव्या कालव्यातून सुमारे ३५० क्युसेस पाणी सिंचनासाठी सोडण्यात येत आहे. उन्हाळी हंगामातील शेती लक्षात घेता १५ मेपर्यंत सिंचनासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- वसई-विरार, तारापूर-बोईसर तसेच मिरा-भाईंदर परिसराला पिण्याच्या पाण्याचाही पुरवठा केला जात असल्याने उपलब्ध पाणीसाठा महत्त्वाचा मानला जात आहे. सध्याचा साठा लक्षात घेता पाणीपुरवठ्यावर तातडीचा कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

