थकीत मालमत्ता करावर ९० टक्के सवलत देण्याची युवा सेनेची मागणी

थकीत मालमत्ता करावर ९० टक्के सवलत देण्याची युवा सेनेची मागणी

Published on

थकीत मालमत्ता करावर ९० टक्के सवलत देण्याची युवा सेनेची मागणी
नेरूळ, ता. १६ (बातमीदार)ः थकीत मालमत्ता करावर अभय योजनेअंर्तगत ९० टक्के सवलत मिळण्याची लेखी मागणी युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणिस निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे. महापालिका प्रशासनाकडून सध्या मालमत्ता कर धारकांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर दंडामध्ये अभय योजनेतंर्गत ५० टक्के सवलत देण्यात येत आहे.
ठाणे महापालिकेमध्ये मालमत्ता करावर थकीत दंडामध्ये ९० टक्के सवलत देण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालमत्ता कराच्या थकीत रकमेवरील दंडामध्ये ९० टक्के सवलत देण्याचे महापालिकांना निर्देश दिले आहेत. ठाणे महापालिकेकडून या निर्देशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेतही ९० टक्के सवलतीची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी युवा सेनेने लेखी निवेदनात केली आहे.
ठाणे महापालिकेपेक्षा नवी मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे. उत्पन्नाचे स्त्रोतही प्रबळ आहेत. त्यामुळेच नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून थकीत मालमत्ता कराच्या दंडामध्ये ९० टक्के सवलत जाहीर करुन नवी मुंबईकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी निखिल मांडवे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com