खरीप हंगामात आनंदवार्ता
खरीप हंगामात आनंदवार्ता
नुकसानभरपाईसाठी प्रशासनाकडून हालचाली
बोर्डी, ता. १५ (बातमीदार) ः खरीप हंगामातील नुकसानभरपाई संदर्भातील याद्या अद्ययावत करण्यासाठी केवायसी करण्याची सूचना तहसील कार्यालयाने शेतकऱ्यांना केल्या आहेत. त्यामुळे २०२४ मध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तलासरी, डहाणू तालुक्यात अतिवृष्टी वादळी वारे आणि बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. कृषी खात्याच्या पाहणी अहवालानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी ३६ हजार रुपये नुकसानभरपाईचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्येक बागायतदाराने केवायसी करून बँकेतील खात्याची खातरजमा केली होती; मात्र दोन वर्षांत बागायतदारांच्या खात्यात नुकसानभरपाईचा निधी येण्यामध्ये अडथळे निर्माण झाले होते. याबाबतीत मदत व पुनर्वसन कार्यालय मंत्रालयात वारंवार पाठपुरावा केल्यानंतर शुक्रवारी (ता. १३) नवीन यादी जाहीर करून संबंधित शेतकऱ्यांनी तत्काळ ही केवायसी करून घेण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. त्यामुळे लवकरच नुकसानभरपाईचा निधी जमा होईल, अशा आशा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

