३१ मार्चपर्यंत पाणीपट्टी भरा; अन्यथा पाणीपुरवठा खंडित करण्याचा सिडकोचा इशारा
३१ मार्चपर्यंत पाणीपट्टी भरा, अन्यथा...
पाणीपुरवठा खंडित करण्याचा सिडकोचा इशारा
नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : सिडको प्रशासनिक क्षेत्रातील ज्या ग्राहकांची पाणीपट्टी देयके प्रलंबित आहेत. त्यांनी येत्या ३१ मार्चपर्यंत थकीत रकमेचा भरणा करावा, असे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे. विहित मुदतीत पाणीपट्टी देयके न भरल्यास संबंधित ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच त्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशाराही सिडकोने दिला आहे.
सिडको क्षेत्रातील विविध नोड व गावांना सिडकोतर्फे पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा नियमित व अखंडित ठेवण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ग्राहकांनी पाणीपट्टी देयक वेळेत भरणे आवश्यक असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांकडे पाणीपट्टीची थकबाकी आहे, त्यांनी ३१ मार्चपूर्वी ती तातडीने भरावी, असे आवाहन केले आहे.
निर्धारित मुदतीपर्यंत थकीत देयकांचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांवर सिडकोच्या नियमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच संबंधितांचा पाणीपुरवठा खंडित केला जाऊ शकतो, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. ग्राहकांना पाणीपट्टी देयके ऑनलाइन पद्धतीने, अधिकृत संकलन केंद्रांवर किंवा सिडको कार्यालयात भरता येणार आहेत. या देयकांबाबत काही त्रुटी अथवा शंका असल्यास संबंधित सिडको कार्यालयाशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी पाणीपट्टीची थकबाकी वेळेत भरून सिडकोला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

