सीबीडी बेलापूर परिसरात १४ वर्षीय मुलीवर अत्याचार
नवी मुंबई, ता. १६ (वार्ताहर) : सीबीडी बेलापूर परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाने त्याच भागातील १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे ती गरोदर राहिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आकाश ऊर्फ ड्वेयन हा संशयित आरोपी फरार झाला आहे. सीबीडी पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्कारासह पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील आकाश आणि पीडित मुलगी हे दोघेही एकाच परिसरात राहण्यास आहेत. ऑगस्टमध्ये पीडित मुलगी सायंकाळच्या सुमारास संशयित तरुणाला इस्त्रीचे कपडे देण्यासाठी गेली होती. त्या वेळी त्याने पीडित मुलीला जवळच्या उद्यानात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. त्यानंतरदेखील आरोपीने पीडित मुलीला धमकावून वारंवार तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केले. पीडितेने या कृत्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला आणि तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प केले. दरम्यान, मुलगी गर्भवती राहिल्याचे लक्षात आल्यानंतर हा सर्व प्रकार उजेडात आला. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी तत्काळ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

