जोगेश्वरी पूर्वेत सर्वोदय नगर बसथांबा अडचणीत

जोगेश्वरी पूर्वेत सर्वोदय नगर बसथांबा अडचणीत

Published on

जोगेश्वरी पूर्वेत सर्वोदय नगर बस थांबा अडचणीत; प्रवाशांचे हाल
जोगेश्वरी, ता. १४ (बातमीदार) : जोगेश्वरी (पूर्व) येथील सर्वोदय नगर मार्गावरील बस थांबा गेल्या अनेक महिन्यांपासून अडचणीत सापडला असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. हेमा इंडस्ट्री परिसरातील तसेच सृष्टी इमारतीसमोरील सर्वोदय नगर बस थांबा सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे पूर्णपणे वेढला गेला आहे.
या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने बस थांब्याभोवती हिरव्या कापडाचे कुंपण घालण्यात आले असून, बॅरिकेड्सही उभारण्यात आले आहेत. त्यामुळे बस थांबा प्रत्यक्षात वापरता येत नाही. परिणामी या मार्गावरील बससेवाही तात्पुरती बंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, फुटपाथवर झाडांच्या कुंड्या, नारळाच्या झाडांच्या लटकत्या झावळ्या तसेच अनधिकृतपणे उभ्या केलेल्या फेरीवाल्यांच्या गाड्या आणि इतर साहित्य यामुळे संपूर्ण फुटपाथ अडथळ्यांनी व्यापला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. फुटपाथ बंद असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. तसेच या अडथळ्यांमुळे बस थांबा सहजपणे नजरेसही पडत नाही. त्यामुळे नव्या प्रवाशांना बस थांबा नेमका कुठे आहे, याचा शोध घ्यावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या के-पूर्व विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच बेस्ट प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन येथे स्वच्छ, सुरक्षित आणि प्रवाशांसाठी आधुनिक बस थांबा उभारावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com