ठाण्यात ‘रीत स्त्रीशक्ती गौरव सन्मान सोहळा’ उत्साहात
ठाणे, ता. १५ (बातमीदार) : समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी रीत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘रीत स्त्रीशक्ती गौरव सन्मान सोहळा’ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या सोहळ्यात समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करून स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा करण्यात आला.
कार्यक्रमात सिने अभिनेत्री महिमा चौधरी, ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजुषा भोगळे, मुंबई अग्निशमन दलाच्या स्टेशन अधिकारी सुनिता अविनाश खोत, स्त्रीरोगतज्ज्ञ व आयव्हीएफ सल्लागार डॉ. स्वाती डोंगरे, तसेच अभिनेत्री स्मिता सरवदे देशपांडे यांसह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते नावेद जाफरी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सन्मानित महिलांनी आपल्या जिद्द, परिश्रम आणि समर्पणाच्या बळावर समाजात वेगळी ओळख निर्माण केल्याचे गौरवोद्गार काढण्यात आले. ट्रस्टच्या संस्थापक रेवा समेळ आणि रवींद्र समेळ यांच्या हस्ते मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

