कर्जतमध्ये अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी
कर्जतमध्ये अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी
कर्जत शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय
कर्जत, ता. १५ (बातमीदार) : कर्जत शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर किशन जावळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेत राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग ५४८-ए (मुरबाड-कर्जत-खोपोली) मार्गावरून शहरातून जाणाऱ्या जड व अवजड वाहनांना आठवड्यातील शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांत सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत प्रवेशबंदी लागू केली आहे. कर्जत शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने आठवड्याच्या शेवटी अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी लागू केली आहे.
मुरबाडमार्गे कर्जत शहरातून खोपोली, चाकण व पिंपरी-चिंचवड परिसराकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. शहरातील चारफाटा रेल्वे पूल व उल्हास नदीवरील श्रीराम पूल अरुंद असल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते. शहरात शाळा, महाविद्यालये, रेल्वे जंक्शन व पर्यटनस्थळे असल्याने नागरिक व पर्यटकांचीही मोठी गर्दी असते. दरम्यान, कर्जत शहर बचाव समितीने शहरातील समस्यांचे सूक्ष्म नियोजन करून त्यावरील उपायसुद्धा प्रशासनाद सुचविले होते. त्यापैकीच अवजड वाहतुकीला बंदी घालण्याची मागणी कर्जत शहर बचाव समितीने केली होती.
या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक रायगड यांच्या प्रस्तावानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. आदेशानुसार शुक्रवार ते रविवार दिवसभर अवजड वाहने कर्जत शहरात प्रवेश करू शकणार नाहीत. मात्र, दूध, पेट्रोल-डिझेल, गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला व पाणी वाहतूक करणाऱ्या वाहनांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे. आदेश तत्काळ लागू करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

