महाराष्ट्रात गोवंशाची संख्या २० लाखांवर

महाराष्ट्रात गोवंशाची संख्या २० लाखांवर

Published on

महाराष्ट्रात गोवंशाची संख्या २० लाखांवर
महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या स्थापनेनंतर वाढ; गोमातेला ‘राज्यमाते’चा दर्जा
उरण, ता. १५ : राज्यात देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांमुळे गेल्या काही वर्षांत गोवंशाच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग स्थापन होण्यापूर्वी राज्यात सुमारे १३ लाख ४१ हजार देशी गोवंश होता. मात्र, गेल्या दोन-अडीच वर्षांत ही संख्या वाढून २० लाख ४३ हजारांपर्यंत पोहोचल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. मुंदडा म्हणाले की, महाराष्ट्र राज्य हे भारतातील एकमेव राज्य असून, येथे गोमातेला ‘राज्यमाते’चा दर्जा देण्यात आला आहे.
उरण येथे पशुसंवर्धनविषयक प्रशिक्षण व कृती सत्र शिबिराचे आयोजन महा एनजीओ फेडरेशन, इंडियन ऑइल अदानी व्हेंचर्स आणि पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये देशी गायीचे दूध १५० रुपये प्रतिलिटर दराने विकले जात असून, त्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे भविष्यात देशी गाईंच्या डेअरी उभारण्यावर शासन भर देणार असून, शेतकऱ्यांना सुरुवातीलाच ७५ रुपये प्रतिलिटर दर मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शिबिरात पशुपालकांना गोठा व्यवस्थापन, खाद्य व पशुसंवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरात उरणचे आमदार महेश बालदी, उपायुक्त पशुसंवर्धन व दुधगाव व्यवसाय जिल्हा परिषद सचिन देशपांडे, गट विकास अधिकारी सर्जेराव पाटील, इंडियन ऑइल अदाणी वेंचर्स सीओओ अतुल खराटे, पंचायत समिती सदस्य, निर्मला घरत, माजी सभापती नरेश घरत, पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी एस. एम. भोजने विस्तार अधिकारी विनोद मिंडे, सर्व पशुधन सहाय्यक, पशुधन परिचरक पशुपालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com