एल्फिन्स्टन पूल बधितांना मिळणार बदलून घरे

एल्फिन्स्टन पूल बधितांना मिळणार बदलून घरे

Published on

एल्फिन्स्टन पूलबधितांना मिळणार बदलून घरे
- म्हाडाकडून आणखी १२ घरांचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होत असलेल्या रहिवाशांपैकी घरे नाकारलेल्या १२ जणांना बदलून घरे मिळणार आहेत. एमएमआरडीएच्या मागणीची दखल घेत म्हाडाने १२ घरे बदलून देण्याकरिता नव्या दुसऱ्या घरांचा शोध सुरू केला आहे. मात्र बदलून दिल्या जाणाऱ्या घरांच्या किमतीचे वाढीव पैसे दिले तरच घरांचा ताबा दिला जाणार आहे.
वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन येथे सध्याचा पूल काढून एमएमआरडीएकडून डबल डेकर पूल उभारला जाणार आहे. त्यामुळे पुलाला लागून असलेल्या हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या दोन इमारती बाधित होत आहेत. लक्ष्मी निवास या इमारतीत ६० तर हाजी नुरानी या इमारतीत २३ रहिवासी आहेत. संबंधित रहिवाशांना दादर, प्रभादेवी, वडाळा, लोअर परळ, भायखळा या भागांतील म्हाडाची ८३ घरे मालकी तत्त्वावर दिली जाणार होती. मात्र पाच रहिवाशांची इतरत्र व्यवस्था झाल्याने एमएमआरडीएने ७८ घरे घेत त्यापोटी म्हाडाला ८९ कोटी रुपये दिले आहेत.

त्यानुसार एमएमआरडीएकडून संबंधित रहिवाशांना घरांचा ताबा दिला असला तरी अँटॉप हिल, दादर पूर्व आणि भायखळा येथे घरे असलेला परिसर योग्य नसल्याने १२ रहिवाशांनी घरांचा ताबा न घेता चांगल्या ठिकाणची घरे देण्याची मागणी केली. त्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने म्हाडाला पत्र पाठवत या घरांच्या बदल्यात दुसरी घरे दिली जावीत, असे स्पष्ट केले होते. त्याची दखल घेत म्हाडानेही ही घरे बदलून देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे संबंधित १२ रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, म्हाडाकडून उपलब्ध करून दिली जाणारी घरे रहिवाशांच्या पसंतीला येणार का, हा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com