दागिने चोरीच्या उद्देशाने महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न

दागिने चोरीच्या उद्देशाने महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न

Published on

भिवंडी, ता. १५ (वार्ताहर) : घरात ५८ वर्षीय महिला एकटी असल्याची संधी साधून त्याच गावातील ३५ वर्षीय महिलेने दागिने चोरीच्या उद्देशाने घरात शिरली. त्या महिलेला मारहाण केली. तिला रक्तबंबाळ करीत तिचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना लोनाड येथील देवरूंग पाड्यातून समोर आली आहे. याप्रकरणी प्रमिला कैलास गोडे (वय ३५) हिच्याविरोधात पडघा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. हा दखलपात्र गुन्हा असताना पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्हा नोंदवल्याने तक्रारदार पार्वती तुकाराम गोडे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना पत्र लिहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com