नायगाव बीडीडीवासीयांना आज चावी वाटप

नायगाव बीडीडीवासीयांना आज चावी वाटप

Published on

नायगाव बीडीडीवासीयांना आज चाव्यांचे वाटप
- ४२३ पोलिस कर्मचाऱ्यांसह ८६४ रहिवाशांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत नायगाव येथे पूर्ण करण्यात आलेल्या पाच पुनर्वसन इमारतींतील ८६४ पात्र रहिवाशांना सोमवारी (ता. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकांचे वितरण करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉइंट येथे सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये ४२३ सदनिका नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असलेल्या पोलिस विभागातील निवृत्त पोलिस, त्यांचे वारस आणि कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांकरिता आहेत.

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या ६.४५ हेक्टर जागेवर तळ अधिक तीन मजल्यांच्या ४२ चाळींमध्ये ३,३४४ भाडेकरू वास्तव्यास आहेत. दोन टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पात २३ मजल्यांच्या २० पुनर्वसन इमारती उभारल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये नायगाव बीडीडी चाळीतील प्लॉट ‘ब’मधील १,४०१ रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यामध्ये आठपैकी पाच पुनर्वसन इमारतींतील ८६४ सदनिकांच्या चाव्या संबंधितांना दिल्या जाणार आहेत. उर्वरित ५३७ सदनिकांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, एप्रिल २०२६मध्ये हे काम पूर्ण होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासांतर्गत येथील चाळींचा कायापालट केला जाणार आहे. त्यानुसार येथे सुसज्ज सदनिका असलेल्या गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल’ असे नामकरण करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com