स्थानकाआधीच अतिक्रमणाचा विळखा

स्थानकाआधीच अतिक्रमणाचा विळखा

Published on

स्थानकाआधीच अतिक्रमणाचा विळखा
कर्जत-पनवेल स्थानकादरम्यान नानासाहेब धर्माधिकारी कमानीलगत अनधिकृत गाळे
नगरपरिषदेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
कर्जत, ता. १५ (बातमीदार) : कर्जत–पनवेल रेल्वे स्थानक उभारणीच्या पार्श्वभूमीवर कर्जत–मुरबाड महामार्गालगत नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराजवळ अनधिकृत गाळ्यांचे बांधकाम सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. संभाव्य वाहतूक कोंडी आणि शहराच्या नियोजनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रेल्वे स्थानक सुरू झाल्यानंतर या भागात प्रवासी, वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रवेशमार्गालगत उभारण्यात येणारे अनधिकृत गाळे भविष्यात वाहतूक कोंडीचे मोठे कारण ठरू शकतात, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
कर्जत शहरात प्रवेश करताना नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार हे शहराचे प्रतीक मानले जाते. आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून हे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. मात्र या कमानीलगतच्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात गाळे उभारण्याचे काम सुरू असल्याने शहराच्या सौंदर्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. नियमांनुसार महामार्गालगत कोणतेही बांधकाम करताना रस्त्यापासून किमान १५ मीटर अंतर ठेवणे आवश्यक असते. मात्र काही ठिकाणी हे अंतर न पाळता थेट रस्त्यालगत बांधकाम सुरू असल्याचे दिसत आहे.
याबाबत कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना काही दिवसांपूर्वी विचारणा करण्यात आली होती. त्यांनी स्थळ पाहणी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही बांधकाम सुरूच असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
चौकट
भविष्यात वाहतूक कोंडीची भीती
कर्जत–पनवेल रेल्वे स्थानक सुरू झाल्यानंतर या परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. अशा वेळी प्रवेशमार्गालगत उभारलेले गाळे आणि अतिक्रमणे कायम राहिल्यास वाहनांची हालचाल अडथळ्यांत येऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने वेळीच कारवाई करून अतिक्रमण रोखावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोट
संबंधित ठिकाणी आमचे पथक पाठवून स्थळ पाहणी केली जाईल. दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- तानाजी चव्हाण, मुख्याधिकारी कर्जत नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com