पुलाचे काम रखडल्याने अपघातमालिका

पुलाचे काम रखडल्याने अपघातमालिका

Published on

तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : तुर्भे येथील सायन-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या या कामामुळे महामार्गाची अवस्था दयनीय झाली असून, वाहनचालकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या भेगा, खड्डे तसेच अडथळे निर्माण झाल्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे.

उड्डाणपुलाच्या कामासाठी रस्त्यावर पडलेल्या भेगा आणि उखडलेल्या भागामुळे नुकत्याच एका दुचाकीस्वाराचे वाहन घसरले. रस्ता ओलांडताना तो अचानक अडखळून खाली कोसळला आणि त्याला दुखापत झाली. या परिसरात यापूर्वीही अनेक वेळा छोटे-मोठे अपघात घडले आहेत. उड्डाणपुलाच्या कामासाठी रस्त्याची खोदाई करून ठेवण्यात आली आहे; मात्र त्याची योग्य दुरुस्ती किंवा सुरक्षेची उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी तर रस्त्यावरील खड्डे आणि भेगा स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक आहे.

या प्रकारामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तुर्भे येथील शहरप्रमुख महेश कोटीवाले यांनी सांगितले, की उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षांपासून सुरू असूनही त्यात कोणतीही गती दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com