मराठी कलाकारांसह स्वप्नातील घराचा शोध
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : घरखरेदी किंवा गुंतवणुकीसाठी विविध पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ला सलग दुसऱ्या दिवशीही ठाणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बदलत्या जीवनशैलीनुसार सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज आणि बजेटमध्ये बसणाऱ्या घरांचा शोध घेणाऱ्या नागरिकांसाठी हा एक्स्पो एक उत्तम संधी ठरला आहे. मराठी कलाकारांनीही या प्रदर्शनाला भेट देत आपल्या स्वप्नातील घरकुलाचा शोध घेतला.
ठाण्यातील हॉटेल टिप टॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय या प्रदर्शनात पुण्यातील अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या प्रकल्पांची माहिती नागरिकांसमोर मांडली आहे. या एक्स्पोमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली विविध गृहप्रकल्पांची माहिती मिळत असून १, २ आणि ३ बीएचके सदनिकांचे अनेक पर्याय पाहण्याची संधी मिळाली. शहराच्या गजबजाटापासून थोडे दूर, निसर्गरम्य वातावरणात राहण्याची इच्छा असलेल्या कुटुंबांसाठी विशेष प्रकल्प सादर करण्यात आले होते. त्यासोबतच आधुनिक सोयीसुविधांनी युक्त निवासी संकुले, बंगलो, रो-हाउस आणि पुनर्विकास प्रकल्पांची माहितीही येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
घरखरेदीसोबतच भविष्यातील गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी एन. ए. प्लॉट्सचेही विविध पर्याय प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रकल्पांची माहिती घेत आपल्या गरजा आणि बजेटनुसार पर्यायांची तुलना करत निर्णय घेण्याची संधी मिळाली. रविवारी सुट्टीच्या दिवशी अनेक ठाणेकरांनी प्रदर्शनाला भेट देत विविध प्रकल्पांविषयी माहिती घेतली. या वेळी मराठी कलाकार प्रणव रावराणे, नगरसेवक संजय वाघुले यांनीदेखील भेट देत प्रदर्शनातील प्रकल्पांची माहिती घेतली. कुटुंबासोबत आलेल्या नागरिकांनी प्रकल्पांच्या सुविधा, परिसर आणि किमतीबाबत चौकशी करत आपल्या स्वप्नातील घराच्या शोधाला सुरुवात केली. एकाच ठिकाणी अनेक गृहपर्याय उपलब्ध झाल्याने ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ नागरिकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांनी सांगितले.
‘सकाळ वास्तू एक्स्पो’ हे प्रदर्शन घरखरेदीदारांसाठी एक पर्वणीच आहे. या ठिकाणी नागरिकांना केवळ हक्काच्या घराचेच नव्हे, तर गुंतवणुकीसाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात विसावण्यासाठी ‘सेकंड होम’चे असंख्य दर्जेदार पर्याय उपलब्ध आहेत.
- संजय वाघुले, नगरसेवक, ठाणे महापालिका
‘सकाळ वास्तू एक्स्पो’मध्ये नागरिकांना ‘सेकंड होम’चे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या बजेटमध्ये बसणारे आणि सर्व सोयीसुविधांनी युक्त घर निवडण्याची ही सुवर्णसंधी आहे. प्रदर्शनाला भेट देऊन पुण्यातील अनेक नवनवीन प्रकल्पांची माहिती घेतली.
- प्रणव रावराणे, मराठी कलाकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

