सायबर ब्लॅकमेलिंगला कंटाळून कल्याणमध्ये ४५ वर्षीय नागरिकाची आत्महत्या
सायबर जाचामुळे कंटाळून
गळफास घेऊन आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ : कल्याण पूर्वेतील एका ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. दरम्यान, असे टोकाचे पाऊल मृताने का उचलले, याबाबत कुटुंबीयांमध्ये संभ्रम होता. म्हणून कुटुंबीयांनी त्यांच्या फोन आणि ईमेलची तपासणी केली असता, अज्ञाताकडून त्यांना ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचे समजले. त्यामुळे कुटुंबीयांनी शनिवारी (ता. १४) अज्ञाताविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करीत सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी परिसरात राहणारे हेमंत दयाशंकर पांडे (४५) यांनी दोन महिन्यांपूर्वी कैलासनगर येथील आपल्या जुन्या घरात पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली होती. या घटनेनंतर कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. कुटुंबीयांनी हेमंत यांच्या फोन आणि ईमेलची तपासणी केली असता एका ईमेलद्वारे त्यांना त्यांची अश्लील छायाचित्रे पाठविण्यात आली होती. ही छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत अज्ञात व्यक्ती त्यांच्याकडून पैशांची मागणी करीत होती. तसेच पैसे न दिल्यास बदनामी करण्याची सतत धमकी दिली जात होती. मोबाईलमधील संदेशांमध्येही अशाच प्रकारच्या धमक्या आढळून आल्या. कुटुंबीयांनी हेमंत यांच्या बँक खात्याची तपासणी केली असता एप्रिल २०२५ ते जून २०२५ या कालावधीत त्यांच्या खात्यातून मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी कुटुंबीयांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली असून, कोळसेवाडी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

