नवी मुंबईत एचपीव्ही लसीकरण मोहिमेला सुरुवात
नवी मुंबईत एचपीव्ही लसीकरण मोहिमेला सुरुवात
१४ वर्षांच्या मुलींना मोफत लस
वाशी, ता. १५ (बातमीदार) ः महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंध करण्यासाठी एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करण्यात आला. सीबीडी बेलापूर येथील नागरी आरोग्य केंद्रात महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात झाली.
या कार्यक्रमाला आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका स्वाती गुरखे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे व डॉ. अर्चना तायडे तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. महापौरांच्या हस्ते विद्या प्रसारक हायस्कूल, बेलापूर येथील अनुष्का कोळी, अक्षता कातकरी आणि नमुंमपा शाळा क्रमांक चारमधील अनुजा माळेकर या विद्यार्थिनींना एचपीव्ही लस देऊन मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
महापौर सुजाता पाटील यांनी महिलांमध्ये वाढत असलेल्या कर्करोगाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ही लस अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींना ही लस मोफत देण्यात येणार असून महापालिकेच्या रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये ती उपलब्ध आहे. पालकांनी आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

