लाडक्या बहिणींसाठी रोजगाराची नवी दारे

लाडक्या बहिणींसाठी रोजगाराची नवी दारे

Published on

रोजगार मेळाव्याला महिलांचा उदंड प्रतिसाद
टिटवाळ्यात २५७ महिलांच्या मुलाखती
टिटवाळा, ता. १६ (वार्ताहर) : महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या मांडा-टिटवाळा मंडळाच्या वतीने आयोजित ‘भव्य रोजगार मेळाव्याला’ टिटवाळा परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या मेळाव्यात तब्बल २५७ महिलांनी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींकडे प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. नगरसेविका उपेक्षा भोईर व भाजप टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विद्या मंदिर’ (मांडा टिटवाळा स्थानकजवळ) येथे हा मेळावा पार पडला.

स्थानिक महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांना कुटुंबाच्या प्रगतीत सक्रिय सहभागी करणे, हे या मेळाव्याचे प्रमुख वैशिष्ट्ये होते. यात २५७ महिलांनी नोंदणी करून मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण केली. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या धर्तीवर महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी रोजगाराची नवी दारे खुली करण्यात आली. या वेळी नगरसेविका उपेक्षा शक्तीवान भोईर यांनी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हाच आमचा मुख्य हेतू आहे. स्थानिक पातळीवरच नोकरी मिळाल्यास महिलांना घर आणि करिअर यांचा समतोल राखणे सोपे जाते. भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबविले जातील, असे म्हटले.

नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांसाठी हा मेळावा आशेचा किरण ठरला असून, या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला भाजपचे मांडा-टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर, उपाध्यक्ष अजय मिश्रा, अमोल केदार, ब्रिजेश पांडे, सुभाष पिसाळ, युवा मोर्चा अध्यक्ष गिरीश भोय, स्वप्नील पाठारे, महेश घोळपकर, शामकुमार गिरी, विनोद इंगळे, महिला अध्यक्षा स्वप्ना दीक्षित, उल्का भरुड, सरिता सिंग यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com