रेल्वे प्रवाशांना मिळणार गरजेच्या सुविधा

रेल्वे प्रवाशांना मिळणार गरजेच्या सुविधा

Published on

रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर
आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते विविध सुविधांचे लोकार्पण
कल्याण, ता. १४ (बातमीदार) : मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे जंक्शन असलेल्या कल्याण रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी ‘रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्स’ सरसावले आहे. कल्याण पूर्वेकडील रेल्वे परिसरात प्रवाशांच्या मूलभूत गरजा ओळखून नव्याने बसवण्यात आलेले दिशादर्शक फलक, रुग्णवाहिका स्ट्रेचर आणि बाकडे यांचे लोकार्पण शनिवारी (ता. १४) आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

कल्याण पूर्वेकडून स्थानकात प्रवेश करताना अनेकदा प्रवाशांना दिशा न समजल्याने गोंधळ उडतो. ही अडचण दूर करण्यासाठी स्पष्ट दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी स्ट्रेचरची सुविधा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विश्रांतीसाठी आरामदायक बाकडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

प्रवाशांच्या मूलभूत गरजा ओळखून रोटरी क्लबने केलेल्या या सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी या गोष्टींची मोठी मदत होईल, असे रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्सने सांगितले. रेल्वे प्रशासनाच्या सोबतीने सामाजिक संस्थांनी उचललेल्या या पावलामुळे कल्याण पूर्व परिसरातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. या लोकार्पण सोहळ्याला आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह स्टेशन मॅनेजर एच. आर. मीणा, महापलिका सहाय्यक आयुक्त सविता हिले, उमेश यमगार, रोटरी क्लबचे पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक आणि मोठ्या संख्येने रेल्वे प्रवासी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com