भटक्या श्वानांना जीवघेणा आजार

भटक्या श्वानांना जीवघेणा आजार

Published on

भटक्या श्वानांना जीवघेणा आजार
पालघर जिल्ह्यात ‘कॅनाइन डिस्टेंपर’चा प्रादुर्भाव
कासा, ता. १६ (बातमीदार)ः पालघर जिल्ह्यात भटक्या श्वानांमध्ये ‘कॅनाइन डिस्टेंपर’ या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या आजारामुळे श्वानांच्या नाक, डोळ्यांतून स्त्राव येणे, डोळे बंद होणे, शरीर अशक्त होण्याबरोबर पाय कडक होणे तसेच पक्षाघातासारखी लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
कासा परिसरातील २० ते २५ भटक्या श्वानांना या आजाराची लागण झाली आहे. त्यांच्यावर प्राणीमित्र सनी गवळी, यतीश पुजारी, लतिष पुजारी, अंकित केणी, तुषार केणी, अमन केणी, जितू पाटील यांनी स्वखर्चाने औषधे खरेदी करून उपचार केले आहेत. त्यापैकी काही श्वांनाची प्रकृती सुधारली आहे. तसेच परिसरातील जखमी किंवा आजारी श्वान आढळल्यास त्यांच्यावर उपचार करण्याचे काम प्राणीमित्र करत आहेत. या कामात पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सचिन वेडगा यांचेही मोलाचे सहकार्य मिळत आहे. विशेष म्हणजे, भटक्या प्राण्यांवर विनाशुल्क उपचार करत आहेत.
---------------------------------------
लसीकरण गरजेचे
डहाणू तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी कॅनाइन डिस्टेंपरचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या आजारावरील लस उपलब्ध शासनाकडे आहे. तसेच हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे बाधित कुत्र्यांना वेगळ्या ठिकाणी ठेवून पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करणे गरजेचे आहे.
---------------------------
कॅनाइन डिस्टेंपर हा कुत्र्यांमध्ये आढळणारा गंभीर विषाणूजन्य आजार आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर कुत्र्यांमध्ये नाक-डोळ्यातून स्त्राव येणे, अशक्तपणा तसेच न्यूरोलॉजिकल लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे पाळीव श्वानांचे वेळीच लसीकरण गरजेचे आहे.
- डॉ. सचिन वेडगा, पशुवैद्यकीय तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com