एसीचे पाणी प्रवाशांच्या अंगावर
एसीचे पाणी प्रवाशांच्या अंगावर
ठाणे-वाडा एसटी प्रवासात मनस्ताप
वाडा, ता. १६ (बातमीदार)ः ठाणे-वाडा-जव्हार मार्गावरील वातानुकूलित बसमधील एसीचे पाणी थेट प्रवाशांच्या अंगावर पडत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. भिवंडी-वाडा मार्गावर सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.
ठाणे आगरातील ठाणे- वाडा-जव्हार मार्गावर एम.एच. ०२ बी डब्ल्यू ०७२८ क्रमांकाची एसटी बस भिवंडी-वाडा महामार्गावरून धावत होती. पण प्रवासादरम्यानच वातानुकूलित बसमधील यंत्रणेत काहीतरी बिघाड झाल्याने एसीतील पाणी थेट प्रवाशांच्या अंगावर पडत होते. बराच काळ हा प्रकार घडत असल्याने प्रवाशांना आडोसा घेण्याची वेळ आली. वातानुकूलित बसची अशा अवस्थेने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, वाडा येथील खंडेश्वरी नाक्यावर पुन्हा बसमध्ये बिघाड झाला. त्यामुळे वाड्यातील प्रवाशांनी खंडेश्वरी नाक्यावर उतरणे पसंत केले. मात्र, या प्रकाराने विक्रमगड, जव्हार येथील प्रवाशांना ताटकळत राहावे लागल्याने एसटी व्यवस्थापनाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

