आरटीई प्रवेशाची एक किलोमीटरची अट पोर्टलवर जैसे थे

आरटीई प्रवेशाची एक किलोमीटरची अट पोर्टलवर जैसे थे

Published on

आरटीई प्रवेशाची एक किलोमीटरची अट पोर्टलवर ‘जैसे थे’
शरद पवार गट आक्रमक; विद्यार्थी हितासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : उच्च न्यायालयाने आरटीई प्रवेशासाठी घातलेली एक किलोमीटर परिघाची अट रद्द करण्याचे आदेश देऊन १८ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, त्याची दुरुस्ती पोर्टलवर केलेली नाही. परिणामी, गोरगरीब घरातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित रहात आहेत. यासंदर्भात शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी कार्याध्यक्ष सिद्धांत व्हटकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन पोर्टलमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
याबाबत राजेश कदम म्हणाले की, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे त्वरित पाठपुरावा करून पोर्टलवरील अंतराचा निकष (१ किमी ऐवजी ३ किमी) अपडेट करून घेण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी विनाअनुदानित शाळांना तीन किमी अंतराच्या सुधारित निकषाचे काटेकोर पालन करण्याबाबत कडक लेखी सूचना निर्गमित कराव्यात, शासनाने जरी १८ मार्चपर्यंत मुदत दिली असली, तरी पोर्टलवरील तांत्रिक बिघाडामुळे पालकांचे अनेक दिवस वाया गेले आहेत. ही हानी भरून काढण्यासाठी प्रवेश प्रक्रियेला किमान २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी.
दरम्यान, ठाण्यातील वंचित व दुर्बल घटकांतील मुलांच्या शिक्षणाचा हा अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे. शिक्षण हक्क कायद्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जाऊ नये, यासाठी आपण या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून तातडीने कार्यवाही करावी अन्यथा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या हितासाठी तीव्र पाऊल उचलावे लागेल, असा इशाराही राजेश कदम यांनी दिला. याप्रसंगी मिलिंद बनकर, बाळेश हत्तिअंबिरे, विश्वास चव्हाण, श्रीकांत बर्वे, महेश मोरे, रोशन त्रिभुवन, नीलेश जाधव, सचिन भातंबरे, साहिल उदुगडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com