खणलेल्या खड्ड्यामुळे गणेश कृपा इमारतीला धोका
खणलेल्या खड्ड्यामुळे गणेश कृपा इमारतीला धोका
रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : ठाणे महापालिका क्षेत्रातील गुरुकुल सोसायटी परिसरात एका विकसकाच्या धोरणामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगररचना क्रमांक १ अंतर्गत अंतिम भूखंड क्रमांक ३४१ वर विकसकाने दर्शनी इमारतीचे काम सुरू केले होते. मात्र, सुमारे तीन ते चार वर्षांपूर्वी मोठा खड्डा खणून तो तसाच सोडून दिल्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
खड्ड्यात दुर्गंधीयुक्त व गढूळ पाणी साचत असल्याने परिसरात मलेरिया आणि डेंगीसारख्या आजारांचा धोका वाढला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय या खड्ड्यामुळे शेजारील गणेश कृपा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या इमारतीच्या कंपाउंडला तडे गेले असून, धोका निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे इमारत कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, रहिवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि गणेश कृपा हाउसिंग सोसायटीच्या सदस्यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई होत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंदोलनाचा इशारा
संबंधित दर्शनी इमारतीची महापालिकेची सी. सी. परवानगी एप्रिल महिन्यात संपत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात तत्काळ कारवाई करून समस्या मार्गी लावावी अन्यथा ठाणे महापालिकेवर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गणेश कृपा हाउसिंग सोसायटीच्या सदस्य व रहिवाशांनी दिला आहे. नागरिकांच्या मागणीनुसार आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणात वेळोवेळी लक्ष घालून पाठपुरावा केल्याची माहिती गणेश कृपा इमारतीतील रहिवासी प्रिया भोसले आणि संदेश प्रभू यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

