दोन महिन्यानंतरही झाडाचा बुंदा रस्त्यावरच

दोन महिन्यानंतरही झाडाचा बुंदा रस्त्यावरच

Published on

दोन महिन्यानंतरही झाडाचा बुंदा रस्त्यावरच
गटाराचे कामही अर्धवट; मिलापनगरमध्ये मोठ्या दुर्घटनेची भीती

कल्याण, ता. १६ (वार्ताहर) : डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर परिसरात ३१ जानेवारी रोजी कोसळलेल्या महाकाय झाडाचा बुंदा दीड महिना उलटूनही अद्याप रस्त्यावरच पडून आहे. यासोबतच एमआयडीसीने गटाराचे कामही अर्धवट सोडल्याने या परिसरात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली असून, प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. मिलापनगरमधील आरएल-६३ आणि २७ भूखंडाजवळ ३१ जानेवारी रोजी एक अवाढव्य झाड महावितरणच्या ट्रान्स्फॉर्मरवर कोसळले होते. यामुळे संपूर्ण निवासी भागाचा वीजपुरवठा सहा तास खंडित झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीच्या ठेकेदाराने गटाराचे काम करताना झाडाच्या खोडाला इजा पोहोचवल्यानेच हे झाड कोसळले होते.

अग्निशमन दलाने झाडाच्या फांद्या कापल्या असल्या तरी, झाडाचे महाकाय मूळ आणि बुंदा अद्याप रस्त्यावरच आहे. गटाराचे काम अर्धवट असल्याने महावितरणचा डीपी आणि वीज वाहक केबल्स उघड्यावर असून, त्या अधांतरी लटकत आहेत. रस्त्यावरील हा अडथळा वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी जीवघेणा ठरू शकतो.

अर्धवट गटार आणि रस्त्यावर पडलेला झाडाचा बुंदा यामुळे येथे कधीही भीषण अपघात होऊ शकतो. एमआयडीसीने आपले काम पूर्ण करावे आणि केडीएमसीने तो बुंदा त्वरित उचलावा, अशी मागणी करूनही प्रशासन ढिम्म आहे. एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे मिलापनगरमधील रहिवाशांमध्ये तीव्र संताप असून, पावसाळा पूर्व कामे तरी वेळेत पूर्ण होणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com