मांडव उभारणीत शेतकरी व्यग्र

मांडव उभारणीत शेतकरी व्यग्र

Published on

मांडव उभारणीत शेतकरी व्यग्र
जनावराच्या चाऱ्याची साठवण करण्याची लगबग
विक्रमगड, ता.१६ (बातमीदार)ः तालुक्यातील ग्रामीण भागात आजही पारंपरिक शेती पद्धती, जनावरांच्या संगोपनाच्या जुन्या पद्धती नजरेआड होत असल्या तरी ग्रामीण काही भागात जपल्या जात आहेत. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत जनावरांच्या चाऱ्याचे विशेष नियोजन केले गेले आहे.
उन्हाळा सुरू होताच ग्रामीण भागातील शेतकरी जनावरांच्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणात साठवण करण्यास सुरुवात करतात. पूर्वीपासून चालत आलेल्या पद्धतीनुसार शेतकरी शेतात किंवा घराजवळ मोकळ्या जागेत लाकूड, बांबू आणि काठ्यांच्या साहाय्याने उंचावर मांडव बांधतात. या मांडवावर गवत, भुसा आणि भाताचा पेंढा यांसारखा चारा साठवला जातो. पावसाळ्यात पावसाचे पाणी थेट चाऱ्यावर पडत नाही. तसेच जमिनीतील ओलावा, कीड व बुरशीपासूनही चाऱ्याचे संरक्षण होते. त्यामुळे चारा जास्त काळ टिकून राहत असल्याने वर्षभरासाठी चांगल्या प्रतीचा चारा उपलब्ध होतो.
-------------------------
आर्थिक बचत
आधुनिक तंत्रज्ञानामुळे ट्रॅक्टर, यंत्रसामग्रीचा वापर वाढला असला तरी अनेक शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धती सोडायला तयार नाहीत. या पद्धती खर्चिक नसून टिकाऊ, पर्यावरणपूरक आहेत. शिवाय स्थानिक उपलब्ध साधनसामग्री वापरून मांडव बांधले जात असल्याने आर्थिक बचतही होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com