गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक

गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक

Published on

गांजाची विक्री करणाऱ्या महिलेला अटक
एक लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
ठाणे, ता. १६ : मुंब्रा परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. मुमताज रुस्तम शेख (४५) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, तिच्याकडून सुमारे चार किलो १०१ ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे.

मुंब्रा येथील संजयनगर भागात एक महिला गांजा विकत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, १५ मार्च रोजी मुंब्रा पोलिसांनी या परिसरात सापळा रचला आणि संशयित मुमताज शेख हिला ताब्यात घेतले. जप्त केलेल्या गांजाची बाजारभावाप्रमाणे किंमत सुमारे एक लाख दोन हजार ५२५ रुपये इतकी आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. जप्त केलेला हा अमली पदार्थ कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून विक्रीसाठी आणण्यात आला होता. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याप्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध मुंब्रा पोलिस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ अंतर्गत कलम ८ (क) व २० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, कल्याणमधील पुरवठादाराचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com