शीळ-मुंब्रा-कळवा ग्राहकांसाठी टोरेंट पॉवरने आयोजित केलेल्या दावत-ए-इफ्तारला उत्स्फूर्त प्रतिसाद,

शीळ-मुंब्रा-कळवा ग्राहकांसाठी टोरेंट पॉवरने आयोजित केलेल्या दावत-ए-इफ्तारला उत्स्फूर्त प्रतिसाद,

Published on

टोरेंट पॉवरच्या ‘दावत-ए-इफ्तार’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

कळवा, ता. १७ (बातमीदार) ः दरवर्षीप्रमाणे एकता आणि समुदाय संबंध वाढवण्याच्या उद्देशाने टोरेंट पॉवरने मुंब्र्यात इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सध्या रमजानचा महिना सुरू आहे, हे औचित्य साधून टोरेंट पॉवरद्वारे शिळ- मुंब्रा- कळवा येथील नागरिकांसाठी डायमंड बँक्वेट हॉल येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला शहरातील सुमारे ३०० मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला सर्व पोलिस ठाण्यांमधील अधिकारी, ठाणे पालिकेचे अधिकारी, प्रमुख राजकीय व्यक्ती, विविध माध्यम प्रतिनिधी आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या वेळी टोरेंटकडून उपाध्यक्ष जीवन क्लार्क, महाव्यवस्थापक जय पंड्या, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी चेतन बदियानी, चीफ ऑफ सिक्युरिटी ब्रिगेडियर विनय बहल, पीआरओ शशिकांत कोठेकर अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. हाफिज रोशिक रझा यांनी उपस्थित पाहुण्यांना रमजान आणि इफ्तारचे महत्त्व समजावून सांगितले.
पाहुण्यांनी टोरेंट पॉवरच्या व्यवस्थेचे कौतुक केले आणि सांगितले, की अशा सामाजिक कार्यक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये सहकार्य, शांतता आणि सुसंवाद वाढण्यास मदत होते. टोरेंट पॉवरचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदियानी यांनी कंपनीच्या लोगोमध्ये झालेल्या बदलाची माहिती पत्रकारांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com