वसई-विरारकरांना आरोग्य कवच
वसई-विरारकरांना आरोग्य कवच
पालिका रुग्णालयांमध्ये आधुनिक सुविधा मिळणार
वसई, ता. १६ (बातमीदार)ः वसई-विरार शहरातील नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्यसेवा देण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे. सीटी स्कॅन, फिजिओथेरपीसह डायलिसिस केंद्राचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे भविष्यात गरजू रुग्णांना लाभ होणार आहे.
वसई-विरार शहरात महापालिकेची सात रुग्णालये, दोन माताबाल संगोपन केंद्रे, २१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, १५ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ३२ आयुष्मान आरोग्य मंदिरे कार्यरत आहेत. नवीन डायलिसिस सेंटर उभारली असून, १२ मशीन कार्यरत आहेत. बाह्यरुग्ण, आंतररुग्ण, प्रसूती सेवा, विविध शस्त्रक्रिया, सोनोग्राफी, गर्भवती माता आरोग्य तपासणी, टेली कन्सल्टेशन, लसीकरण, आरोग्य जनजागृती, मोफत औषधे व तपासण्या, रक्त तपासणी इत्यादी सेवा दिल्या जात आहेत. तसेच माता बाल संगोपन केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य वर्धिनी केंद्रे व आपला दवाखाना येथे येणाऱ्या रुग्णांसाठी सीटी स्कॅन, एमआरआय, ईईजी, फिजिओथेरपी, किमोथेरपीची सुविधा संलग्नीकरणद्वारे उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी अनुभवी संस्थाकडून अभिव्यक्ती स्वारस्य दर मागविण्यासाठी प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मांडला असून, महासभेत चर्चा केली जाणार आहे.
--------------
खासगी डायलिसिस हस्तांतरित
वसई-विरार महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील अनुभवी संस्थाकडून खासगी डायलिसिस विभाग वैद्यकीय आरोग्य विभाग हस्तांतरित करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळावी, यासाठी शुक्रवारी चर्चा होणार आहे.
--------------
७७.५० कोटींचा प्रस्ताव
वसई-विरार शहर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या एकूण रुग्णालय व्यवस्थापनासाठी स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात २०२५-२६ आर्थिक वर्षात ५२.७८ कोटी, २०२६-२७ मध्ये ७७.५० कोटी रुपये इतकी तरतूद प्रस्तावित आहे.
----------
वसई-विरार शहरातील नागरिकांना पुरेपूर आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आरोग्य विभागात डायलिसिस, सीटी स्कॅनसह ईईजी, फिजिओथेरपी व किमोथेरपी सुविधा संलग्नीकरण द्वारे उपलब्ध करण्यासाठी प्रस्तावित आहे.
- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त
----------
वसई-विरार पालिकेच्या आरोग्य विभागाकडून रुग्णांची तपासणी, औषधोपचार मोफत केले जात आहेत. अधिकाधिक आरोग्यसेवा महापालिका रुग्णालय, केंद्रात नागरिकांना मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- अजीव पाटील, महापौर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

