सेवा प्रवेशांसाठी समिती

सेवा प्रवेशांसाठी समिती

Published on

सेवा प्रवेशांसाठी समिती
मिरा-भाईंदर महापालिकेचा निर्णय
भाईंदर, ता.१६ (बातमीदार): मिरा-भाईंदर महापालिकेच्या सेवा प्रवेशात आवश्यक बदल केले नसल्याने स्थायी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आक्षेप कर्मचारी संघटनांकडून सातत्याने घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमात बदल करण्यासाठी समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
काही महिन्यांपूर्वी महापालिकेत रिक्त असलेल्या १,०७८ पदांपैकी ३४० पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यात लिपिक, कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरिक्षक, अग्निशामक, चालक, बालवाडी शिक्षिका आदी पदांचा समावेश होता. मात्र, या भरतीला महापालिका कर्मचाऱ्याच्या श्रमिक जनरल कामगार संघटना, श्रमजीवी संघटनांनी आक्षेप घेतला. या प्रक्रियेमुळे अनेक वर्षांपासून पालिकेत कार्यरत असलेल्या स्थायी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप संघटनांकडून केला जात आहे. त्यामुळे सेवा प्रवेश नियमात बदल करण्यासाठी आयुक्तांनी समितीची स्थापना केली आहे. या समितीत उपायुक्त, मुख्य लेखा परीक्षक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, शहर अभियंता, सहाय्यक आयुक्तांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच आवश्यक बदल करून नवीन नियम राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे.
---------------------------------
नोंदवलेले आक्षेप
महापालिकेतील गेली २० ते २५ वर्षे कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रता असतानाही पदोन्नती मिळालेली नाही. पदोन्नतीसाठी पद रिक्त नसल्याचे कारण कर्मचाऱ्यांना दिले जाते. त्यामुळे आधी सेवा प्रवेश नियमात आवश्यक बदल करा, नंतर भरती करा, अशी मागणी संघटनांनी केल्याने महापालिकेची भरती प्रक्रिया बारगळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com