हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर बाईक रॅली

हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर बाईक रॅली

Published on

स्वागतयात्रेच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत बाइक रॅली
भगव्या फेट्यांतील तरुणाईचा जल्लोष; १२० हून अधिक दुचाकीस्वारांचा सहभाग

डोंबिवली, ता. १६ : येत्या गुरुवारी (ता. १९) साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्ष स्वागतयात्रेच्या निमित्ताने रविवारी (ता. १५) डोंबिवलीत भव्य बाइक रॅली काढण्यात आली. भगवे ध्वज, जयघोषाचा निनाद आणि तरुणाईचा अफाट उत्साह यामुळे संपूर्ण शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.

नेहरू रोडवरील आप्पा दातार चौकातील श्री गणेश मंदिर येथून रॅलीला उत्साहात सुरुवात झाली. त्यानंतर जोशी हायस्कूल, गणेशनगर, अग्निशमन दल, श्रीधर म्हात्रे चौक, दोन टाकी, उमेशनगर, रेती बंदर रोड, विष्णूनगर, आनंदनगर उद्यान, सम्राट चौक, पंडित दीनदयाळ मार्ग, स्टेशन रोड, कोपर पूल, टंडन रोड आणि मानपाडा रोड अशा प्रमुख मार्गांवरून ही रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक व शहीद विनयकुमार सच्चान स्मारक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

रॅलीत सुमारे १२० हून अधिक बाइकस्वारांनी सहभाग नोंदवला. डोक्यावर भगवे फेटे परिधान केलेल्या तरुण-तरुणींसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘प्रभू रामचंद्र की जय’ अशा घोषणांनी डोंबिवलीचा परिसर दुमदुमून गेला होता.

रॅलीच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना १९ मार्चला होणाऱ्या मुख्य स्वागतयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले. शहरात उत्साहाचे वातावरण असून यंदाची यात्रा अभूतपूर्व असेल, असे श्री गणेश मंदिर संस्थानच्या आयोजन समितीचे म्हणणे आहे. श्री गणेश मंदिरचे विश्वस्त आणि संयोजन समितीच्या सदस्यांनी श्रीफळ वाढवून रॅलीला सुरुवात झाली. या उपक्रमामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, गुढीपाडव्याच्या मुख्य सोहळ्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com