रोह्यात लंडन विद्यापीठासारखी शिक्षण पद्धती आणण्याचा प्रयत्न : खा. सुनील तटकरे

रोह्यात लंडन विद्यापीठासारखी शिक्षण पद्धती आणण्याचा प्रयत्न : खा. सुनील तटकरे

Published on

रोह्यात लंडन विद्यापीठासारखी शिक्षण पद्धती आणण्याचा प्रयत्न : खा. सुनील तटकरे
सुनील द. तटकरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे लोकार्पण
रोहा, ता. १६ (बातमीदार) : लंडनमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना मोठा खर्च करावा लागतो. आगामी काळात रोह्यासारख्या ठिकाणी जगातील विविध देशांतील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतील, अशा दर्जाची शिक्षण व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले. रविवारी (ता. १५) पांडुरंगशास्त्री आठवले संकुल येथे वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट, रोहा व युनिक अकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सुनील द. तटकरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी’च्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
तटकरे म्हणाले, की माझ्या वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावे; मात्र मी राजकारणात आलो. शिक्षण आणि वाचन संस्कृती वाढावी यासाठी रोह्यात समृद्ध ग्रंथालय उभारले आहे. कोकणातही स्पर्धा परीक्षांसाठी चांगले वातावरण निर्माण होत असून, युवकांना मार्गदर्शन मिळावे यासाठी ही अकादमी सुरू करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार अनिकेत तटकरे यांनी केले. या वेळी मंत्री आदिती तटकरे, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, नगराध्यक्ष वनश्री शेडगे, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, मुख्याधिकारी अजय एडके तसेच विविध मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लासेसच्या उद्‍घाटन प्रसंगाचा मला भाग होता आले याचा आनंद आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई किंवा दिल्ली येथे जावे लागत होते. मात्र आता रोह्यातच हे केंद्र उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे, असे मत रोहा नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी व्यक्त केले.
उद्याची पिढी घडवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी वरदाई ट्रस्टमार्फत स्पर्धा परीक्षा अकॅडमी सुरू करण्यात आल्याचा अभिमान आहे. रायगड जिल्ह्यातील मुलामुलींना दर्जेदार शिक्षण व मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची मार्गदर्शन सत्रेही येथे आयोजित केली जाणार असून, भविष्यात अनेक आयपीएस अधिकाऱ्यांचा सत्कार रोह्यात व्हावा अशी अपेक्षा आहे, असे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

फोटो कॅप्शन : सुनील तटकरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या लोकार्पणप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना खा. सुनील तटकरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com