अपहरणाच्या प्रयत्नाची ऑडिओ क्लिप खोटी

अपहरणाच्या प्रयत्नाची ऑडिओ क्लिप खोटी

Published on

अपहरणाच्या प्रयत्नाची ऑडिओ क्लिप खोटी
नौपाडा पोलिसांचे स्पष्टीकरण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : येथील टेकडी बंगला परिसरातील शाळेमधील एका विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा दावा करणारी ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या क्लिपमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु अशी कोणत्याही प्रकारची घटना घडली नसल्याचे नौपाडा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल ऑडिओ क्लिपची दखल घेऊन पोलिसांनी तातडीने शाळा परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. शाळा प्रशासन आणि संबंधित पालकांशी चर्चा करून संपूर्ण घटनेची पडताळणी केली, परंतु तपासादरम्यान अपहरणाचा कोणताही प्रयत्न झाल्याचे आढळून आले नाही.

पालकांनी केली दिलगिरी व्यक्त
याप्रकरणी ऑडिओ व्हायरल करणाऱ्या पालकांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच, परत असा प्रकार घडणार नाही, याची शाश्वती देतो. संबंधित पोलिसांना भेटून त्यांच्याकडेही दिलगिरी व्यक्त केली आहे, तर सामाजिक माध्यमांवर फिरत असलेल्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणतीही माहिती मिळाल्यास ती पडताळून पाहिल्यानंतरच पुढे पाठवावी, असे आवाहन नौपाडा पोलिसांनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com