गुढीपाडव्यानिमित्त मोटारसायकल रॅलीचे नियोजन
गुढीपाडव्यानिमित्त मोटारसायकल रॅलीचे नियोजन
जोगेश्वरी, ता. १६ : हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी गुढीपाडव्याच्या निमित्ताने जोगेश्वरी पूर्व परिसरात भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली गुरुवारी (ता. १९) सकाळी १० वाजता गुढी उभारून सुरू होणार आहे.
ही मोटारसायकल रॅली जोगेश्वरी गुंफा परिसरातून सुरू होऊन मेघवाडी पोलिस ठाणे, स्वामी विवेकानंद शाळा, प्रेमनगर, ठाकूर नगर, जोगेश्वरी स्थानक, रामवाडी, दुर्गा नगर, एमएमआरडीए कॉलनी आदी परिसरातून मार्गक्रमण करत इच्छापूर्ती गणेश मंदिर येथे तिचा समारोप होणार आहे. या वेळी ढोल-ताशा पथक, नृत्याविष्कार तसेच सर्वोत्तम वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, सहभागींसाठी विविध बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या मोटरसायकल रॅलीचे आयोजन खासदार रवींद्र वायकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. या रॅलीत शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांच्यावतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

