नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे रॅकेट उघड;
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेट उघड
तळोज्यात कारवाई; एका आरोपीला अटक, दोन तरुणींची सुटका
नवी मुंबई, ता. १६ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तळोजा परिसरात धाड टाकून आंतरराष्ट्रीय देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बांगलादेशातून कामाचे आमिष दाखवून तरुणींना भारतात आणून त्यांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एका बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली असून, दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
तळोजा परिसरातील घोटगाव येथे काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या पथकाने १५ मार्च रोजी छापा टाकून नोयोन टोकीबोर शेख उर्फ आर्यन (२५) याला ताब्यात घेतले. या वेळी दोन तरुणीही तेथे आढळून आल्या. चौकशीत या दोन्ही तरुणी आणि आरोपी मूळचे बांगलादेशातील असल्याचे समोर आले. लोया उर्फ स्वाती आणि तिचा पती सलमान या दाम्पत्याने एका तरुणीला चांगल्या नोकरीचे प्रलोभन दाखवून भारतात आणले. मात्र, येथे आल्यानंतर तिला धमकावून वेश्याव्यवसायात ढकलल्याचे उघड झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

