नवी मुंबईत ‘बाल मराठी संमेलन’
मुलांमध्ये मराठीची गोडी वाढविण्यासाठी ‘बाल मराठी संमेलन’
विविध सांस्कृतिक उपक्रमांत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
नेरूळ, ता. १६ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत राज्य मराठी विकास संस्थेतर्फे ‘बाल मराठी भाषा संमेलन २०२६’चे आयोजन करण्यात आले असून, सोमवारी सकाळी संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सिडको प्रदर्शन केंद्र अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या संमेलनाला वनमंत्री गणेश नाईक, महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे, ज्येष्ठ बालनाटककार प्रतिभाताई मतकरी, नाट्यकर्मी सुप्रिया विनोद, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी तसेच पद्मश्री सुलेखनकार अच्युत पालव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमस्थळी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. बालकांच्या विकासासंबंधी विविध संदेश, चित्रफलक आणि माहिती फलक लावण्यात आल्यामुळे संमेलनस्थळ अधिक आकर्षक व संदेशप्रधान दिसत आहे. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करीत अशा संमेलनांमुळे मुलांमध्ये मराठी भाषेबद्दल आत्मीयता वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.
------
मराठी ही केवळ भाषा नसून ती आपल्या संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. लहान वयातच मुलांना मराठी साहित्य आणि संस्कृतीशी जोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- गणेश नाईक, वनमंत्री
------
मराठी भाषा अत्यंत सुंदर असून, मुलांमध्ये तिची गोडी निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. मुलांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देण्यासाठी असे उपक्रम दरवर्षी आयोजित व्हावेत.
- महेश कोठारे, ज्येष्ठ अभिनेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

