भिवंडीत ३४० अनधिकृत गॅस सिलिंडर जप्त

भिवंडीत ३४० अनधिकृत गॅस सिलिंडर जप्त

Published on

भिवंडीत ३४० अनधिकृत गॅस सिलिंडर जप्त

भिवंडी, ता. १६ (वार्ताहर) : भारतातही काही ठिकाणी गॅसची टंचाई जाणवू लागल्याने गॅस सिलिंडरचा काळाबाजार वाढत असल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर नियंत्रक शिधावाटप विभागाने भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाईचा बडगा उगारला आहे. भिवंडी शहरात शनिवारी झालेल्या कारवाईनंतर सोमवारी पुन्हा कामतघर-अंजूरफाटा रस्त्यावरील एका गोदामावर धाड टाकण्यात आली. या कारवाईत ३४० गॅस सिलिंडरचा अनधिकृत साठा आढळून आला.

नियंत्रक शिधावाटप संचालक, नागरी पुरवठा विभाग, मुंबई यांच्या कार्यालयाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कामतघर येथील एका पत्र्याच्या गोदामात मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडर साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर उपनियंत्रक परिमंडळ ‘फ’ कार्यालय, ठाणे यांच्या संयुक्त भरारी पथकाने छापा टाकला. छाप्यात एजिस पुअर गॅस कंपनीचे चार टेम्पो आढळून आले. त्यामध्ये एकूण ३४० गॅस सिलिंडर होते. त्यापैकी ५६ सिलिंडर गॅस भरलेले तर २८४ रिकामे होते. या कंपनीचे अधिकृत साठवणूक केंद्र वाडा येथे असताना भिवंडीत हा अनधिकृत साठा ठेवण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून, जप्त केलेल्या सर्व सिलिंडरबाबत जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती भरारी पथकाचे प्रमुख भगवान खंडेराव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com